आज मला
जरा निवांत झोपूद्या
बंद खोलीत
उघड्या खिडकीतून
ताऱ्यांशी बोलूद्या
आज मला जरा निवांत झोपूद्या
पांघरलेल्या चुकांना
हळूच डोकावून बघुद्या
आज मला जरा निवांत झोपूद्या
उद्या पळू कि परत, शोधायला !!
माझं काय आणि कोण
आज फक्त बसुद्या
जरा… निवांत झोपूद्या
जरा निवांत झोपूद्या
निरंजन कुलकर्णी
१८-जुलै-२०२०