प्रणव

प्रणव लिहीतोय चार ओळी आज काय काय सांगू सर्वानां प्रणवबद्दल; चूकुन देखील केलं कोणी त्याला GK मधे चॅलेंज तर बरोबर जीरवतो तो त्यांची अद्दल, असतो सदैव हसतमुख आणि म्हणतो मी आहे थोडासा इंट्रोवर्ट; लगेच सफाईला लागतो जर का दिसली घरात त्याला थोडीशी जरी डर्ट, अथक परिश्रम आणि कष्ट करून मिळवले त्याने उत्तमोत्तम काॅलेज; सदैव वाचनContinue reading “प्रणव”

आई

आम्हा सर्वांसाठी दादा आहेत विठूमाऊली आणि तु खरी रखुमाई; छान शब्दच मिळत नव्हते जेंव्हा लिहायला बसलो चार ओळी आज तुझ्यासाठी आई, लहानपणापासून जेवताना ताटात वाढलस आम्हांला तू भरपूर तूप; आत्ता जमल्या चार ओळी जेंव्हा विचार मी केला तुझ्याविषयी खूप, वाढदिवसाला देते तु आशिर्वाद म्हणून २००० ची नोट; आयुष्यात नेहमीच खात्री केलीस तु राहू नये घरात कोणाचेही भूकेलं पोट, रोज आंघोळ करून तुला नमस्कार करताना नसते आशिर्वादांची तुझ्याकडे कधीच कमी; सईने हट्ट केला की तु ती पूर्ण करणार याची सदैव असते तीला नक्कीच हमी, तुला वाटते भीती कुत्र्यांची असो तो राॅकी किंवा टाॅमी; सर्व भाच्यांची सर्वात लाडकी आहेस तूच प्रेमामामी, लहानपणी अभ्यास करताना तू कधीच नाही वापरलीस मारायला फूटपट्टी; रोज तासनतास फोनवर बोलताना कळून येते तुझी आणि शैलाकाकूची गट्टी, ॲक्सिडेंट झाल्यावर तू घातलंस त्याला आपल्या लहान मुलासारखं खायला खाऊ; सुहासकाका नेहमीच वागतो जसाकाही तो आहे तुझाच लहान भाऊ, आयुष्यात हे नाही किंवा ते नाही म्हणून तु कधीच नाही केलास कुठलाही कागा; खूप कष्टाने नाजूकरीत्या सांभाळलास तू सर्व नात्यांमधला अचूकसां धागा, कर्नाटकातून आलीस तू मराठी जरी नाही आलं तुला बोलतां तसं स्पष्ट; खरोखरी घडवलंस आम्हां भावंडांच आयुष्य तू करून सदैव कष्ट, तु कधीच नाही केलास कुणाबरोबर कुठलाही गनिमी कावा; मी तुझ्यासाठी नेहमीच राहीलो तुझा गोंडस छावा( सिंहिणीचे पिल्लू), तू नेहमीच रेडी असतेस सई बरोबर खेळायला असो कुठलाही गेम; खात्री आहे मला तू कधीच कमी पडून देणार नाहीस अमच्यावर असणार तुझं प्रेम, आयुष्यात दिलीस दादांना तू सदैव साथ बनून त्यांची सावली; अर्पण करतो तुला आज या चार ओळी तूच आहेस माझी खरी गुरू माऊली…

निर्मलाआत्या

निर्मलाआत्या म्हणजे भावंडांमध्ये सर्वात लाडकी आमच्या अप्पांची; रेखा(आत्या) आणि ती एकत्र आल्या की पर्वणी असते गप्पांची, फळांमधे तीला आवडतात केळीं, चिक्कू आणि आंबा; सदैव दिला तिने आम्हा भाच्यांच्या उच्च शिक्षणास पाठिंबा, नातवंडांमधे आहेत सोहम आणि कबीर तिचे खुपच लाडके; माहीत नाही का डाॅक्टर तीला सजेस्ट करतात खायला कार्ले आणि दोडके, कसब्यातल्या गणपतीवर आहे तिची अपार भक्ती; म्हणूनच की काय तोच तिला देत राहतो अपरंपार शक्ती, कन्या शाळेला मिळाला तिच्या रूपात एक अप्रतीम प्रींसीपल; आत्ता रोज खायला सांगीतलाय डाॅक्टरांनी तीला एक तरी ॲपल, शाहूचौकातले विठोबा आहेत नेहमीच तिच्यासाठी फलदायक; त्यांच्या प्रसादात मिळाला तीला परफेक्ट लाइफ पार्टनर विनायक(काका), विनायक काका तीला म्हणत असतील “मिलेगा नहीं तुम्हें मेरे जैसा कोई दुबारा; त्या दोघांना भेटून नक्कीच अनुभवाल तुम्ही प्रेमाचा वात्सल्यपुर्ण गाभारा, आदर्श शिक्षिका असून तिच्यात दिसते साक्षात सरस्वतीचे रूप; दोन्ही मुलींना सीए आणि डाॅक्टर करताना तिने कष्ट मात्र घेतले खूप, आज या चार ओळींच्या रुपाने आम्ही सर्वजण देतो तिला भरपूर शुभेच्छा; लवकरात लवकर तीची या डायलीसिस मधुन व्हावी सुटका हीच आहे आम्हा सर्व लेकरांची इच्छा…

सीमाकाकू

पूर्वाश्रमीची ती लीना बोंटडकरांची झाली ती सीमा(काकू); आम्हाला शिकवले तिने कसा करावा प्रत्येक कठीण प्रसंगाचा खीमा, तीच्या आगमनाने पळून गेला सुहासकाकाच्या कुंडलीतला मंगळ; सुहासकाका आणि ती असले की असते आम्हा मुलांची खायची चंगळ, तिच्या पोटि जन्माला आलं जेंव्हा प्रणव रूपी एक गोंडस बाळ; तेंव्हापासून सुरू झाला तीच्या भरभराटीचा सुवर्ण काळ, लहानपणापासूनच तीने दिले प्रणवला शिस्तीचे धडे; चान्स मिळाला तर नक्की खाऊन बघा तीच्या हातचे गरमागरम पत्रवडे, तीला वाटतं सर्वच र्मुलींनी व्हावं प्रणव वर फिदा; म्हणून केला चीज आणि बटरला त्याच्या आहारातून अलवीदा, मला म्हणते खूप यश मिळव आयुष्यात माझ्या बाळा; सल्ला असतो तीचा सदैव दारू आणि सिगरेटचा मोह टाळा,  प्रणवला ती लाडीगोडीने म्हणते अप्पू; लहानपणापासून तीला जवळचे वाटतात मुन्ना आणि पप्पू, आहे तिचा गोंदवलेकर महाराजांवर खूपच विश्वास; तळमळतो तीचा जीव जर प्रणवने खाल्ला नसेल अन्नाचा एक घास,  अश्विनीला सासुबाईंच्या रूपात मिळाली अजून एक आई; सीमाकाकू नक्कीच सांगेल प्रणवला नको करूस ४/५ नातवंडांची घाई, अश्विनीच्या रूपात तीला मिळाली एक सदगुणी सून; क्षणोक्षणी प्रणवच्या पाठीशी उभी रहील असो सन अथवा मून, तीचा प्रयत्न असतो नात्यातले बंध रहावेत नेहमीच घट्ट; लवकरच सुरू करेल ती प्रणव आणि अश्विनीकडे नातवंडांचा हट्ट!!!

रेखाआत्या

आजीच्या अनुपस्थितीत रेखाआत्या होती सर्वांची मम्मी; भावंडांमधे जास्त लाडकी आहे तिची लहान बहीण निम्मी, दिवसंरात्र कष्ट केले तिने जुळवायांस आपल्या भावंडांची लग्न; राहात नाही तिला आठवण खाण्यापिण्याची एकदाका ती झाली कामात मग्न, तिच्या पोटी जन्मले शुभांगीताई आणि अमित सारखे दोन मोती; नेहमीच जपल्या तिने सासरच्या आणि माहेरच्या सर्वच नातीगोती, सदैव तयार असते ती खायला असो कुठलाही लाडू; आश्चर्य वाटतं कसेकाय ओळखीचे असतात तीच्या सगळ्यांचेच जावई आणि साडू, कामास एका पायावर तयार असते ती असो लग्न किंवा मुंज; वर्षानुवर्ष देत आहे ती तिच्या फ्रोझन शोल्डरशी झुंज, कार्यक्रम असला की तिची धडक असते कार्यालयात थेट; कधीच सोडत नाही ती बोलायचा चान्स जेंव्हा होते नातेवाईकांची गाठभेट,  खडानखडा पाठ आहेत तिचे श्रीसुक्ताची ओळन् ओळ; सर्वत्र तिची ओळख आहे असो पुण्यातले कुठलेही गल्लीबोळ, तिला गप्पा मारायला विषय नाही लागत कधीच कुठलाही खास; तिच्याशी फोनवर बोलताना कळत नाही कसे संपतात तासन तास, लपवून ठेवते आतल्या डब्यात अमितसाठी ती स्पेशल खाऊ; बाहेरून कडक दिसत असली तरीही स्वभावाने आहे ती खूपच मऊ, मला हक्काने मागते ती कधीही हवी असेल जर तिला लिफ्ट; लाखमोलाचं असतं तीच्या आशिर्वादांचं प्रेमळ गिफ्ट,  गायब होतात तीचे दुखण्यामुळे आलेले डोळ्यातील आसु; एकदाका तिने पाहिले चिरागच्या चेहर्यावरचे इऊलेसे हसु, प्रत्येक नववधूला सांगते ती ‘लग्नानंतर सांभाळ गं बाई तुझी फिगर; खात्री आहे मला संतुलित आहाराने कंट्रोलमधे ठेवेल ती आपली श्युगर!!!

जनाकाका..

ते आहेत दिगंबर; घरातले जनाकाका आणि ॲाफिसातले Digs; आजी नक्कीच खायला देत असणार त्यांना काजू बदाम आणि Figs, सर्वच कामं ते करतात असो धुणंभांडी किंवा दळण; फक्त पाॅझीटिव ॲटीट्यूड दिसतो त्यांचा असो जीवनातील कुठलेही वळण, शैलाकाकू जनाकाका आहेतच जणू लक्ष्मी नारायण; चुकवत नाहीत कधीच ते अभ्यंकरांचं पारायण, दादा आणि ते म्हणजे होती जोडी राम-लक्ष्मण; सदैव पाठीशी असतात ते असो कधीही पैशांची चणचण, कधीच फोर्स करत नाहीत कुणावरही ते आपलं मत; दिसतं मला त्यांच्यात बोंटडकर कुटुंबातील मायेचं छत, आम्हा सर्वांवर सदैव असो त्यांच्या प्रेमाची सावली; कठीण प्रसंगात ते असतात माझे खरे वीठू माऊली, नेहमीच असते माझ्यावर त्यांच्या आशीर्वादाची छाया; नक्की सांगतो..कधीच कमी पडू देणार नाहीत ते मला माझ्या वडिलांची माया!!!

माझी प्रिय पूर्वा

आजच्या चार ओळ्या आहेत माझ्या प्रिय पुर्वा साठी; देवानेच बांधुन ठेवल्या होत्या आमच्या लग्नाच्या गाठी, विधीलिखित लिहून ठेवलेली ती वेळ आली; २००९ साली आमची पहिली भेट झाली, तीच्या येण्याने आयुष्यात आली खूपच छान बहार; नेहमीच ठेवती ती माझा डायेटयुक्त आहार, तीचा सल्ला म्हणजे दुख्खावर पेनरीलिफ बाम; परफेक्शन असतं तिचं कुठलेही असो काम, प्रत्येक कार्यक्रमात असतो तीचा प्रेमाचा आहेर; मान ठेवते सर्वांचां सासर असोवा माहेर, ठेवते ती सदैव भावनांवर संतुलित ताबा; तीच्या खूपच जवळचे आहेत ओंकार आणि बाबा, सईचे मार्क छान असतात असो कुठलीही सेमिस्टर; म्हणुनच आहे पूर्वा माझी परफेक्ट होम मिनिस्टर, मला म्हणते ‘ reduce your tummy and increase your chest’; अर्रे एकदा तरी नक्कीच करून बघा तिच्या केकची टेस्ट, सगळेच म्हणतात पूर्वा आहे बोंटडकरांची नंबर वन सून; आज सांगतो लवकरचं करू आपलं सेकंड हनीमून!!!

माझी स्वीटहार्ट सई

आजची कवीता आहे माझी स्वीटहार्ट सई  घरात येते रंगत जेंव्हा एकत्र असतात सई पूर्वा आणि आई, आहेत तीचे बोलके आणि पाणीदार डोळे रडू आलं की सर्वांचं ऋदय होते लोण्याचे गोळे, तीला आवडतात गुलाबजाम आणि त्याचा पाक सर्व मुलांमधे येतो हुरुप ऐकुन तिची एक हाक, शाळेच्या परीक्षेची तिला असते सदैव आस छान छान मार्क मिळवायचा तिचा असतो कायम ध्यास, रहायला आवडत तिला नेहमीच टिपटाॅप, कार्टून मधे तीचा फेव्हरेट आहे छोटा सिंघम काॅप, सतत गूणगूणत असते गाण्यांच्या ओळी आईला म्हणते दे मला फक्त तूप लावलेली पोळी, आजीला सांगते माझ्यासाठी काकडी गाजर काप कार्टुन लागलं की TV समोर बसते आपोआप, लहान असोवा मोठे ती ठेवते सर्वांचा आदर घरी असलो की म्हणते बाबा करू का एक गाणं सादर, आजोबांवर होता तिचा जीव आणि आहे तिचं खूप प्रेम म्हणते त्यांच्या शिवाय कम्म्प्लीट होत नाही फॅमिली फोटोफ्रेम, सोहम आणि यश आहेत तिचे फेव्हरेट भाऊ कधीही तयार असते खायला ती गोडगोड खाऊ, रोज सांगतो तिला मोबाईल गेमवर ठेव थोडा ताबा आयुष्यभर नक्कीच साथ देईल तुला हा तुझा बाबा..

ऋषी

चारओळ्या आमच्या भावासाठी- आमच्या भावंडात सर्वात लहान आहे आमचा ऋषी, सर्वत्र मिरवतो तो आपली दाढी आणि मिशी, आईला बघवत नाही जर तो असेल उपाशी, मनातील गुपित नक्कीच सांगतो तो आईपाशी, नेहमीच आधार वाटतो त्याला बाबांच्या प्रेमळ कुशी, जेंव्हा येईल तो त्याच्या वयाच्या तिशी, तेंव्हा सुरू करू आपण आपल्या भांवंडांची एक बीश्शी! 😄

देशपांडे परीवार

खास देशपांडे कुटुंबीयांस- ह्या वर्षीच्या पावसात झाला सर्व निसर्ग ओलाचींब, नेहमीच दिसते ऋुषीत आम्हांस पद्माआत्या आणि सुनिलकाकांचे प्रतिबिंब, सदैव आहे देशपांडे कुटुंबीयांच्या पाठीशी माता जगदंब ! 🙏🙏