Categories
General Topic

प्रणव

प्रणव

लिहीतोय चार ओळी आज काय काय सांगू सर्वानां प्रणवबद्दल;

चूकुन देखील केलं कोणी त्याला GK मधे चॅलेंज तर बरोबर जीरवतो तो त्यांची अद्दल,

असतो सदैव हसतमुख आणि म्हणतो मी आहे थोडासा इंट्रोवर्ट;

लगेच सफाईला लागतो जर का दिसली घरात त्याला थोडीशी जरी डर्ट,

अथक परिश्रम आणि कष्ट करून मिळवले त्याने उत्तमोत्तम काॅलेज;

सदैव वाचन करून विसरत नाही तो अपडेट ठेवायला त्याचं जनरल नाॅलेज,

कामाच्या गडबडीत इच्छा असुनही नाही जमत त्याला करायला घरातील धूणी आणि भांडी;

असाच गुटगुटित दिसावा म्हणून अश्विनी रोज देते त्याला खायला चार उकडलेली अंडी,

खात्री आहे आम्हा सर्वांनां अश्विनिच्या जोडीने गाठेल तो आयुष्यात खूप मोठा टप्पा;

म्हणतो कसा चैन पडत नाही जर का नाही मारल्या दिवसातून एकदातरी अश्विनिशी फोनवर गप्पा,

क्रिकेट खेळतो तो उत्तम असतो नेहमीच मॅन ॲाफ मॅच;

शांत चित्त्ताने आणि हसत मुखाने नक्कीच पार करेल तो जीवनातील सर्वच बॅड पॅच,

सदैव शांत असतो म्हणून चुकूनही पाहू नका त्याच्या सहनशीलतेचा अंत;

कृपा असो महाराजांची कधीच राहू नये त्याच्या मनांत कुठलीही खंत,

जीवनातील त्याच्या यशात आहे आई बाबांचा सिंहाचा वाटा;

स्कील आहे त्याच्याकडे हळुवार प्रेमाने काढतो तो सर्व शत्रुंचा काटा,

त्याचं संयमीत वागणं बघून येतो एका मॅचूअ्रड माणसाचा फील;

छान वाटतं जेंव्हा म्हणतोदादा मी देतो हाॅटेल मधे सर्वांचं बील”,

देव करो असाच सदैव झळकत राहो आमच्या कुटुंबातील हा चमकतां तारा;

पहाचं तुम्ही ज्युनियर प्रणवच्या आगमनाने सर्वत्र बरसतील मोठ्या मोठ्या गारा

Latest posts by Ek Veda Kavi (see all)

2 replies on “प्रणव”

Leave a Reply