Categories
General Topic

आई

आम्हा सर्वांसाठी दादा आहेत विठूमाऊली आणि तु खरी रखुमाई;

छान शब्दच मिळत नव्हते जेंव्हा लिहायला बसलो चार ओळी आज तुझ्यासाठी आई,

लहानपणापासून जेवताना ताटात वाढलस आम्हांला तू भरपूर तूप;

आत्ता जमल्या चार ओळी जेंव्हा विचार मी केला तुझ्याविषयी खूप,

वाढदिवसाला देते तु आशिर्वाद म्हणून २००० ची नोट;

आयुष्यात नेहमीच खात्री केलीस तु राहू नये घरात कोणाचेही भूकेलं पोट,

रोज आंघोळ करून तुला नमस्कार करताना नसते आशिर्वादांची तुझ्याकडे कधीच कमी;

सईने हट्ट केला की तु ती पूर्ण करणार याची सदैव असते तीला नक्कीच हमी,

तुला वाटते भीती कुत्र्यांची असो तो राॅकी किंवा टाॅमी;

सर्व भाच्यांची सर्वात लाडकी आहेस तूच प्रेमामामी,

लहानपणी अभ्यास करताना तू कधीच नाही वापरलीस मारायला फूटपट्टी;

रोज तासनतास फोनवर बोलताना कळून येते तुझी आणि शैलाकाकूची गट्टी,

ॲक्सिडेंट झाल्यावर तू घातलंस त्याला आपल्या लहान मुलासारखं खायला खाऊ;

सुहासकाका नेहमीच वागतो जसाकाही तो आहे तुझाच लहान भाऊ,

आयुष्यात हे नाही किंवा ते नाही म्हणून तु कधीच नाही केलास कुठलाही कागा;

खूप कष्टाने नाजूकरीत्या सांभाळलास तू सर्व नात्यांमधला अचूकसां धागा,

कर्नाटकातून आलीस तू मराठी जरी नाही आलं तुला बोलतां तसं स्पष्ट;

खरोखरी घडवलंस आम्हां भावंडांच आयुष्य तू करून सदैव कष्ट,

तु कधीच नाही केलास कुणाबरोबर कुठलाही गनिमी कावा;

मी तुझ्यासाठी नेहमीच राहीलो तुझा गोंडस छावा( सिंहिणीचे पिल्लू),

तू नेहमीच रेडी असतेस सई बरोबर खेळायला असो कुठलाही गेम;

खात्री आहे मला तू कधीच कमी पडून देणार नाहीस अमच्यावर असणार तुझं प्रेम,

आयुष्यात दिलीस दादांना तू सदैव साथ बनून त्यांची सावली;

अर्पण करतो तुला आज या चार ओळी तूच आहेस माझी खरी गुरू माऊली…

Latest posts by Ek Veda Kavi (see all)

3 replies on “आई”

Leave a Reply