निर्मलाआत्या म्हणजे भावंडांमध्ये सर्वात लाडकी आमच्या अप्पांची;
रेखा(आत्या) आणि ती एकत्र आल्या की पर्वणी असते गप्पांची,
फळांमधे तीला आवडतात केळीं, चिक्कू आणि आंबा;
सदैव दिला तिने आम्हा भाच्यांच्या उच्च शिक्षणास पाठिंबा,
नातवंडांमधे आहेत सोहम आणि कबीर तिचे खुपच लाडके;
माहीत नाही का डाॅक्टर तीला सजेस्ट करतात खायला कार्ले आणि दोडके,
कसब्यातल्या गणपतीवर आहे तिची अपार भक्ती;
म्हणूनच की काय तोच तिला देत राहतो अपरंपार शक्ती,
कन्या शाळेला मिळाला तिच्या रूपात एक अप्रतीम प्रींसीपल;
आत्ता रोज खायला सांगीतलाय डाॅक्टरांनी तीला एक तरी ॲपल,
शाहूचौकातले विठोबा आहेत नेहमीच तिच्यासाठी फलदायक;
त्यांच्या प्रसादात मिळाला तीला परफेक्ट लाइफ पार्टनर विनायक(काका),
विनायक काका तीला म्हणत असतील “मिलेगा नहीं तुम्हें मेरे जैसा कोई दुबारा;
त्या दोघांना भेटून नक्कीच अनुभवाल तुम्ही प्रेमाचा वात्सल्यपुर्ण गाभारा,
आदर्श शिक्षिका असून तिच्यात दिसते साक्षात सरस्वतीचे रूप;
दोन्ही मुलींना सीए आणि डाॅक्टर करताना तिने कष्ट मात्र घेतले खूप,
आज या चार ओळींच्या रुपाने आम्ही सर्वजण देतो तिला भरपूर शुभेच्छा;
लवकरात लवकर तीची या डायलीसिस मधुन व्हावी सुटका हीच आहे आम्हा सर्व लेकरांची इच्छा…
- प्रणव - January 12, 2020
- आई - January 7, 2020
- निर्मलाआत्या - January 2, 2020
2 replies on “निर्मलाआत्या”
सुंदर मुन्ना दादा!😃😃
किती चपखल वर्णन आहे निमा मावशीचे.