Categories
General Topic

निर्मलाआत्या

निर्मलाआत्या म्हणजे भावंडांमध्ये सर्वात लाडकी आमच्या अप्पांची;

रेखा(आत्या) आणि ती एकत्र आल्या की पर्वणी असते गप्पांची,

फळांमधे तीला आवडतात केळीं, चिक्कू आणि आंबा;

सदैव दिला तिने आम्हा भाच्यांच्या उच्च शिक्षणास पाठिंबा,

नातवंडांमधे आहेत सोहम आणि कबीर तिचे खुपच लाडके;

माहीत नाही का डाॅक्टर तीला सजेस्ट करतात खायला कार्ले आणि दोडके,

कसब्यातल्या गणपतीवर आहे तिची अपार भक्ती;

म्हणूनच की काय तोच तिला देत राहतो अपरंपार शक्ती,

कन्या शाळेला मिळाला तिच्या रूपात एक अप्रतीम प्रींसीपल;

आत्ता रोज खायला सांगीतलाय डाॅक्टरांनी तीला एक तरी ॲपल,

शाहूचौकातले विठोबा आहेत नेहमीच तिच्यासाठी फलदायक;

त्यांच्या प्रसादात मिळाला तीला परफेक्ट लाइफ पार्टनर विनायक(काका),

विनायक काका तीला म्हणत असतील “मिलेगा नहीं तुम्हें मेरे जैसा कोई दुबारा;

त्या दोघांना भेटून नक्कीच अनुभवाल तुम्ही प्रेमाचा वात्सल्यपुर्ण गाभारा,

आदर्श शिक्षिका असून तिच्यात दिसते साक्षात सरस्वतीचे रूप;

दोन्ही मुलींना सीए आणि डाॅक्टर करताना तिने कष्ट मात्र घेतले खूप,

आज या चार ओळींच्या रुपाने आम्ही सर्वजण देतो तिला भरपूर शुभेच्छा;

लवकरात लवकर तीची या डायलीसिस मधुन व्हावी सुटका हीच आहे आम्हा सर्व लेकरांची इच्छा…

Latest posts by Ek Veda Kavi (see all)

2 replies on “निर्मलाआत्या”

Leave a Reply