Categories
General Topic

आमची कॅंकून वारी

२०१९ हे वर्ष आम्हा सगळ्यांना एक्दम गडबडीचे आणि बऱ्याच बदलांचे होते. मुलींचे अरंगेत्रम , निहारिकाचे कॉलेज यामुळे हे वर्ष कधी सुरु झाले आणि सरले ते कळले पण नाही .म्हणून शेवटी क्रिसमस सुट्टीत कॅंकून ला जायचे ठरवले. मेक्सिकोच्या आग्नेय दिशेला कॅरिबियन समुद्र किनाऱ्यावर वसलेले हे गाव. एकदम आपल्या गोव्याची आठवण करून देणारे. आमची हे पहिलीच मॅक्सको बाजूची ट्रिप होती. मेक्सिको भौगोलिक साधारण भारतासारखे आहे, खूपशी झाडे आपल्याकडे असतात तीच. कण्हेर, तगर, तेरडा, बोगनवेल सदाफुली सगळीकडे बहरलेली. आकाशी नीलमणी समुद्र, नितळ निळे आकाश आणि पांढरी स्वच्छच मऊ वाळू. अजून काय पाहिजे सुट्टीसाठी ? पण आम्ही आता साधे नाही राहिले, बरच अमेरिकावासी झालो आहोत. ऑल इन्कलुसिव्ह रिसॉर्ट पण लागते हे सगळे अजून एन्जॉय करायला . या रिसॉर्ट मध्ये होती ८ रेस्टोरंटस, २ कॉफी शॉप्स, स्पा, ३ स्विमिन्ग पूल आणि पाहिजे ते बसल्या जागी आणून देणारा सेवकवर्ग 

https://kinfolkclub.com/wp-content/uploads/2020/01/drerc_aerial2_1.jpg?w=1024

आमचे रिसॉर्ट ड्रीम्स रिव्हिएरा

हायड्रोथेरेपी स्पा

स्विमिन्ग पूल्स

लॉबी

खोली

या रिसॉर्ट मधले सगळ्यात पॉश रेस्टोरंट होते ते फ्रेंच. तिकडे आत जाण्यासाठी ड्रेस कोडे पण होता, पुरुषांचे कॉलर वाले शर्ट आणि पँट्स, शॉर्ट्स चालत नाहीत. बायकांचे ड्रेस किंवा पार्टी टॉप्स, जीन्स नाहीत, स्लीपर्स नाहीत वगैरे. आम्ही बाहेर मेनू पाहिला , एकमेव व्हेजिटेरिन डिश सलाड. पण तरी विचार केला एकदा जावेच. दोन तास बाहेर थांबल्यावर आत प्रवेश.

 एकदम सुंदर टेबले, छान म्युजिक , प्रशांत वातावरण

पण वेटर छान होता. तो म्हणाला तो व्हेज डिश अरेंज करेल. तिथले जेवण पाच कोर्स वाले.

पहिले आले अँपेटीझर. एका सुंदर प्लेटमध्ये अर्ध्या चेरी टोमॅटोवर,चीज आणि अर्धे द्राक्ष

दुसरा कोर्स सलाड. ४ पाने आणि ड्रेसिंगची सुंदर ओळ

तिसरा कोर्स बटाटा सूप. आख्खे तीन चमचे भरून होते ते.

मग मेन कोर्स . त्याचं वर्णन ५ ओली होते मेनू कार्ड मध्ये पण आली डिश ती मधल्या बोटाच्या लांबीची ग्रेप लीव्हज मधली गुंडाळी .

मग डेसर्ट २ घास (छोटे बरं )केक आणि २ घास आईस क्रिम

मग कळले कि फ्रेंच लोक इतके बारीक कसे राहतात ते. आम्ही आपले बाहेर आलो , खाली वर्ल्ड कॅफेला जाऊन पास्ता खाल्ला आणि मग पोट भरले .

दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो शेल-हा या वॉटर पार्क आणि डॉल्फिन ऍडव्हेंचरला . आम्ही पाहिलेल्या सगळ्या पार्कपेक्षा एकदम वेगळी नैसर्गिक पार्क आहे ही . स्नॉर्केलिंग केले, मुलीनी क्लीफ डायविंग केले, प्रचंड मोठी वॉटर स्लाईड होती. पाण्याची गुहा पाहिली .

OLYMPUS DIGITAL CAMERA
OLYMPUS DIGITAL CAMERA
OLYMPUS DIGITAL CAMERA
OLYMPUS DIGITAL CAMERA

मग पाळी होती डॉल्फिनची. . त्यांना शिकवलेले असते, त्यामुळे तुमच्या जवळ येतात, कसरती करतात, त्यांना टच केले तरी चालते. सुंदर फ्रेंडली प्राणी .

एक दिवस झिपलाइन पार्क केली. उंच उंच जायचे आणि १० वेगवेगळ्या स्पीड आणि अंतराच्या झिपला लटकून यायचे. खाली बघायची भीती वाटत होती पण मजा ही येत होती. सगळ्यात वेगळे होते ते झिप रोलर कोस्टर . तुम्हाला शेवट दिसत नाही आणि किती वरखाली आहे ते पण कळत नाही.

मेक्सिकोला पण भारतासारखा इतिहास आहे. खूप जुने पिरॅमिड्स आहेत, उत्खलन केलेली आहेत. आम्ही अशाच एका ठिकाणी गेलो होतो . कोबा नावाची जागा आहे. मायन लोकांनी देऊळ बांधली आहेत. त्यांची देवळे आपल्यासारखी नाहीत. पूर्ण सपाट जागी असल्यामुळे, त्यांना देऊळ म्हणजे टेकडी बांधावी लागायची. टेकडी म्हणजे देऊळ त्यांचे, आत गाभारा वगैरे नाही. दर बावन्न वर्षांनी त्याच देवळावर नवीन देऊळ बांधायचे. असे करत करत उंची वाढवत जायची देवळाची. वरती जायचे आणि निसर्ग देवतेला (वरुण , सुर्य ,अग्नी ) प्रार्थना आणि बाकी काही अर्पण करायचे. जवळ जवळ १२ माजली उंच देऊळ ते. चढलो पण उतरताना दोरी धरून बसून बसून उतरावे लागले.

मेक्सिको भागाचे अजून एक वैशिष्ठ म्हणजे सिनोटे. जमिनीखाली गुहा आणि त्याचे छप्पर पाहून एक भोक पडलेले आणि पाण्याने भरलेलं . मेक्सिको भाग पूर्ण चुनखडीच्या दगडाचा आहे. त्यामुळे जमीन मऊ म्हणून अशी सिंक-होल तयार होतात. पूर्वीच्या काळी हेच त्यांचे प्यायच्या पाण्याचे स्रोत होते. अजूनही मायन लोक तिकडे जाण्यापूर्वी पूजा करून जातात. आम्ही कधीही अनुभवले नव्हते अशा जागा आहेत त्या. ५० फूट रॅपलिंग करून दोरीला धरून खाली जायचे. अंधारी गुहा, पण मोठी, स्विमिन्ग करता येते. वटवाघुळे फिरत होती. वरच्या मॅन्ग्रोव्ह झाडांची मुळे लटकत होती . स्वच्छ पाणी, सगळा खालचा तळ दिसतो. तिकडे स्विमिन्ग करताना मजा आली.

सिनोटेचा दुसरा प्रकार म्हणजे पूर्ण जमिनीने घेरलेले पण मध्यभागी उघडे. तिकडेही एक दिवस स्विमिन्ग केले.

OLYMPUS DIGITAL CAMERA
OLYMPUS DIGITAL CAMERA
OLYMPUS DIGITAL CAMERA

प्लाया डी कार्मेन हे जवळचे अजून एक गाव. फाईव्ह स्टार तुळशी बागेसारखी दुकाने एका बाजूला आणि शॉपिंग मॉल्स दुसऱ्या बाजूला. शेवटी समुद्र किनारा. बोटींच्या स्वागतासाठी किनाऱ्यावर मोठी कमान होती.

जवळ जवळ सगळे फोटो आम्ही काढलेले आहेत, पण काही वेबसाईट वरून घेतले कारण आम्हाला काढायला परवानगी नव्हती.

6 replies on “आमची कॅंकून वारी”

बसल्या जागी मेक्सिकोची सफर झाली. वर्णन आणि छायाचित्रे दोन्ही आकर्षक.

खूपच सुंदर लिखाण. काही चविष्ट गोष्टी सुद्धा. वाचायला मजा आली. बघायला पण आवडेल.

काय वर्णन आहे. Neighbour’s envy चा अनुभव घेत आहे. पण वर्णनाने पोट भरले व फोटो म्हणजे cherry on the top. Enjoyed the tour.

Leave a Reply