बोंटडकर असे भारदस्त नाव घेऊन आला योगेश जन्मा ,
पण गोरा गोमटा बाळ झाला पप्पूचा भाऊ मुन्ना ।
लहानपणापासून आहे शांत सज्जन ,
कधीच आठवत नाही त्याचे छचोरपण ।
चोखली वेगळी शैक्षणिक वाट ,गेला कॉमर्सला ,
बघता बघता फडकावला सी .ए . चा झेंडा ।
घरघर करत असतो सारखा परदेशवारी ,
आम्हाला वाटतो अभिमान जेंव्हा चढतो नोकरीत पायरीवर पायरी ।
पुण्यात फिरते त्याची होंडा सिटी ,
कधीही सांगा हजर आहे वाजवत शिट्टी ।
कुठलेही असो गेट टुगेदर करतो सर्वांना गोळा ,
पण पार्टीची जान आहे याची नाचगाणी उखाणा ।
आहे बरोबर जीवनसाथी पूर्वा ,
एकापेक्षा एक सुंदर केक बनवता बनवता करते सर्वांवर ममता ।
त्यांची सई आहे लाडकी फुलराणी,
तिच्याबद्दल काय लिहू आईबाबांचे नाव चालवणार ही सर्वगुणी ।
दादा मामा होता घरात थोरला कर्ता करवता ,
हा चालवतो त्याची वाट कोणालाही जाणवू न देता ।
किनफोक वर लिहितो कविता सुंदर सर्वकाळी ,
आम्हाला नाही जमत पण समजून घे ही फुलाची पाकळी ।।
- आमची कॅंकून वारी - January 1, 2020
- आमचा लाडका मुन्ना - December 5, 2019