Kinfolk club

मी मंडई – अर्थात मंडईचे मनोगत

सुनील देशपांडे सायंकाळी ५ वाजता मोटरसायकल वरून बालाजी किराणा मालाच्या दुकानापाशी आला. नेहमी प्रमाणे गाडी लावली. इकडे तिकडे पहात माझ्या दिशेने यायला सुरुवात केली.
अरेच्या, नेहमी सकाळ सकाळ मंडई करणारा सुनील आज चक्क संध्याकाळी? क्या बात है? कुठ function ला गेला होता काय? कुणास ठाऊक.
पण आज एक एक वस्तु घेताना, त्याचा भाव विचारल्यावर सुनीलच्या चेहर्यावर काय भाव उमटणार आहेत, या कल्पनेने मला हसू आले.
नारळ सगळ्यात छोटा तीस रुपये झाला होता. पावगी वर्गमित्र. काय करणार? घेतला एक नारळ पडक्या चेहर्याने.
कोणतीच भाजी वीस रूपये पावपेक्षा कमी नाही. अपरीहार्यता व अगतिकता ठपकत होती त्याच्या चेहऱ्यावरून. पण स्वत: शीच पुटपुटला काय करता आडला नारायण….. व निघाला शेवटच्या item कडे. जड असतो ना तो item.
तेथे मात्र कळस झाला. जणू काही संयमाचा बांध फुटला. कांदा! एक किलो द्या. दुकानदाराने दिले, याने घेतले नेहमीप्रमाणे. १०० रूपये झाले. काय? सुनीलला अंगावर पाल पडल्यासारखे झाले. घ्यावे तर मन धजावेना, परत करावे तर मध्यमवर्गीय भिडस्त भित्रेपणा आडवा आला.
पण सुनीलचा तो चेहरा पाहून ठरवल चला अता याच्याशी थोड बोलल पाहिजे.
काय आज संध्याकाळी येणे केले?
नाही दुपारी जरा बाहेर जेवायला गेलो होतो Barbecue Nation मधे. सुनील उवाच.
काय? कस झाले मग दुपारचे Barbecue Nation मधील जेवण?
अरे वा, मस्तच झाले की. इति सुनील.
काय रेट आहेत रे सध्या? महाग आहे जरा. १००० रूपये पर पर्सन. पण Worth आहे. सुनीलने स्पष्टीकरण दिले.
अरे वा, एकवेळच्या जेवणाचे हजार रूपये Worth? व महिन्याची कुटुंबाची मंडई १००० रूपये महाग? कुछ हजम नहीं होता यार.
बहुतेक त्याचे डोळे चमकले.
थोडा विचारात पण पडला.
बहुतेक Thanks ही पुटपुटला.
मला सगळ्यांना सांगावस वाटल.
कारण मला ईथे खुप सुनील भेटतात.

Skip to toolbar