पूर्वाश्रमीची ती लीना बोंटडकरांची झाली ती सीमा(काकू);
आम्हाला शिकवले तिने कसा करावा प्रत्येक कठीण प्रसंगाचा खीमा,
तीच्या आगमनाने पळून गेला सुहासकाकाच्या कुंडलीतला मंगळ;
सुहासकाका आणि ती असले की असते आम्हा मुलांची खायची चंगळ,
तिच्या पोटि जन्माला आलं जेंव्हा प्रणव रूपी एक गोंडस बाळ;
तेंव्हापासून सुरू झाला तीच्या भरभराटीचा सुवर्ण काळ,
लहानपणापासूनच तीने दिले प्रणवला शिस्तीचे धडे;
चान्स मिळाला तर नक्की खाऊन बघा तीच्या हातचे गरमागरम पत्रवडे,
तीला वाटतं सर्वच र्मुलींनी व्हावं प्रणव वर फिदा;
म्हणून केला चीज आणि बटरला त्याच्या आहारातून अलवीदा,
मला म्हणते खूप यश मिळव आयुष्यात माझ्या बाळा;
सल्ला असतो तीचा सदैव दारू आणि सिगरेटचा मोह टाळा,
प्रणवला ती लाडीगोडीने म्हणते अप्पू;
लहानपणापासून तीला जवळचे वाटतात मुन्ना आणि पप्पू,
आहे तिचा गोंदवलेकर महाराजांवर खूपच विश्वास;
तळमळतो तीचा जीव जर प्रणवने खाल्ला नसेल अन्नाचा एक घास,
अश्विनीला सासुबाईंच्या रूपात मिळाली अजून एक आई;
सीमाकाकू नक्कीच सांगेल प्रणवला नको करूस ४/५ नातवंडांची घाई,
अश्विनीच्या रूपात तीला मिळाली एक सदगुणी सून;
क्षणोक्षणी प्रणवच्या पाठीशी उभी रहील असो सन अथवा मून,
तीचा प्रयत्न असतो नात्यातले बंध रहावेत नेहमीच घट्ट;
लवकरच सुरू करेल ती प्रणव आणि अश्विनीकडे नातवंडांचा हट्ट!!!
- प्रणव - January 12, 2020
- आई - January 7, 2020
- निर्मलाआत्या - January 2, 2020
One reply on “सीमाकाकू”
सुंदर मांडणी आणि चपखल पकडलेले स्वभावाचे कंगोरे…🙏😎