मी पेशाने वकील. अनेक कौटुंबिक प्रकरणे मी निकालात काढलेली होती. बऱ्याच प्रकरणांमध्ये सुनेला सासूचा काहीना काहीतरी त्रास हा असायचाच. त्यामुळे एकूणच सासू ही सुनेची शत्रूच असते, हा संस्कार माझ्या मनावर झालेला होता.
माझं लग्न झाले. अनेकदा सासूशी कसे वागायचे याचे सल्ले दिल्यामुळे मला भिती नव्हती. आणि माझ्या आयुष्यात सासू नामक प्रकरण सुरू झाले. माझ्या वैचारिक विश्वातील शत्रुत न बसणारी अतिशय भाबडी, सरळ, गरीब वागणारी, जिला साधंसुधं सुद्धा रागं भरता येत नाही अशी बाई मला सासू म्हणून लाभली.
आमच्याकडे एक कामाला रूक्मिणी नावाची बाई लावली होती. ती काम नीट करत नसे. मी कोर्टाच्या कामानिमित्त दिवसभर बाहेर असायचे. घरी अशी सासू. बायका पण बरोबर जोखतात मालकिणींना. मी घरी आले की पसारा तसाच असायचा. ती बाई काम करायचा आव आणायची. आज काय तिने अभंगच म्हणून दाखवला. उद्या काय तिला दुसरे अर्जंट काम आहे. अशा एक ना दोन अडचणी ठरलेल्या. शेवटी मी माझ्या सासूबाईंना सांगितले. तिला जरा नीट काम करायला सांगा. नाहीतर तिला आपण काढून टाकू. रोज मी संध्याकाळी घरी आले की त्यांना विचारायचे, ‘तिला तुम्ही ओरडलात का? ‘ त्या रोज तिला गोड शब्दांत काम करायला सांगायच्या, पण ओरडू काही शकायच्या नाहीत. मला कळेना सासूला कसे सांगावे, म्हणजे त्या, त्या बाईला ओरडतील. शेवटी एक दिवस मीच त्यांना घरातून ऑफीसला जाताना धमकावले की, ‘आज जर तुम्ही तिला कामावरून काढून टाकायची धमकी दिली नाहीत, किंवा सरळ कामावरून काढून टाकले नाहीत, तर आज तुमचे व माझे जबरदस्त भांडण होईल.’ मला माहित होते माझ्याशी भांडण करायचे सासूबाईंना जास्त टेन्शन येणार त्यामुळे आज त्या बाईला नक्कीच ओरडतील किंवा कामावरून काढून टाकतील.
संध्याकाळी मी नेहमी प्रमाणे घरी आले. आल्या आल्या सासूबाईंना विचारले, तुम्ही रूक्मिणीला बोललात की नाही?. त्या म्हणाल्या “हो, हो, बोलले तर, चांगले खडसावले”. मी त्यांना विचारले तुम्ही काय बोललात. तर त्या मला म्हणाल्या, मी तिला सांगितले, “ते तुझ्या कामावर प्रसन्न नाहीयेत”
मी तुझ्या लेखावर फार फार प्रसन्न आहे. हसून हसून पुरेवाट…👌👌👍
LikeLiked by 1 person
खूप छान वाटले
LikeLike
खूप छान वाटले
LikeLike
ही कथा प्रत्यक्ष तुझ्या तोंडून ऐकली व आता वाचली फारच मजेशीर
LikeLiked by 1 person
किती मऊ स्वभाव. ग्रेटच अगदी. तू त्यांच्यापुढे हात टेकलेस का ग
LikeLiked by 1 person
खूप छान लिहीले आहे… पुढील ब्लॉग ची प्रतीक्षा आहे… 😎
LikeLike
तुझ्याकडुन प्रत्यक्ष ऐकलेला अनुभव कथा वाचायला पण आवडली. सासुबाई जात्याच शांत व समजुतदार त्यात वकिल सुन आहे म्हणुन त्यांना असंही वाटलं असेल की काय करायची ती कारवाई तु करशीलच आपण संभाळुन घेणंच जास्त रास्त. त्यांची खडसावण्याची व्याख्या पण किती नम्र.
LikeLiked by 1 person
खूप, खूप छान वाटले तुझी प्रतिक्रिया वाचून. धन्यवाद.
LikeLike
अफलातून 😂
LikeLiked by 1 person
छान लेखणी , बोलण्यासारखे तुझे लिहिणे छान
LikeLike
Kharach kiti khare ahe. Apan sagali Bontadkar generation kayam nakavar rag gheun asate. Prasanna vatane he kiti avaghad ahe. Deshpande aaji hotyach tasha kayam shant ani Sanyat. Pan nantar kay zale tya baiche? Tumachyavar prasanna zali ka nahi ti?
LikeLike