Kinfolk club

फौदाच्या निमित्ताने

‘फौदा’ नेटफ्लिक्स मालिका पाहिली.

राजकीय विषयावरील अभ्यासपूर्ण आणि तरीसुद्धा रंजक अशी मालिका काढता येऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे फौदा ही मालिका आहे.

पॅलेस्टाईन सारखा संवेदनशील विषय हाताळला आहे. मालिका गतिमान आहे सुंदर आहे. गुणवत्ता, अभिनय सर्वार्थाने अप्रतिम आहेच.

पण मला जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यागासाठी आवश्यक असलेली राष्ट्रभावना  म्हणजे हौदा.

पॅलेस्टाईन व ज्यू यांच्या  मध्ये काय फरक होता असा विचार केला तर ‘एक राष्ट्रीय संकल्पना’एवढा एकच फरक होता असे जाणवले.

मोसाद व पॅलेस्टाइन मुस्लिम हे सुडाचाच खेळ खेळत होते पण एकाच यामागे राष्ट्राच्या अपमनाचा सूड तर दुसरीकडे मात्र वैयक्तिक सूड. परीणाम इस्त्रायलचा जय.

राष्ट्रीय भावनेचे दर्शन, टेक्नॉलॉजी ची ताकद याचे भव्य दर्शन तर आहेच पण त्याच बरोबर वैयक्तिक सूडातून येणारे खोकलेपण, एकटेपण आणि परकेपण इतकी अचूक पणे टीपली आहे कि ती एक सूडकथा न राहता अतिशय प्रत्ययकारी भावकथा  बनली आहे.

निष्पाप जीवांची फरफट इतक्या प्रत्ययकारी पद्धतीने साकारली आहे की मन सुन्न होऊन जाते.

इस्लामची कृरता व ज्यू लोकांची निडरता ज्या सुंदर पद्धतीने चित्रित केली गेली आहे की तो प्रचार न वाटता, सुंदर असं समाज जीवनाचे चित्रण झालं आहे.

कथा इतकी वास्तववादी तयार केली आहे की प्रत्यक्ष इतिहासच आपण बघतो आहोत असा भास होतो.

राजकीय विषयावर सखोल चिंतन पाहिचे असेल त्यांनी फौदा उर्फ दंगल ही मालिका जरूर पाहिली पाहिजे. माझ्या कडून दहा पैकी दहा गुण.

Skip to toolbar