राजकारण आणि राजकारणी

राजकारण आणि राजकारणी

तुमच्या व्यक्ती आणि वल्ली मधल्या या सगळ्या वल्या एकत्र केल्या तरी आमचा एक राहुल बाबाच त्यांना पुरेसा आहे. तुमच्याकडे पुस्तक पैसे देऊन विकत घ्यावं लागतं तर आमच्याकडे सर्व करमणूक फुकट आहे.
आर के लक्ष्मण म्हणू नका, वसंत सबनीस म्हणून नका, चाचा चौधरी असुदे, पण जर राजकारण नसत किंवा राजकारणी नसते तर यांच्या व्यंगचित्रावर कुणीतरी हसलं असतं का? जगभर पसरलेल्या या सर्व व्यंगचित्रकारांच्या पोटापाण्याचा बंदोबस्त कोण करतो? हेच राजकारण व राजकारणी ना? कोणतही हास्य कवि सम्मेलन हे राजकारण व राजकारणी यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकेल का?
फक्त विनोदी नाही, तर जगभरातील कला, साहित्य व संस्कृती ही जिवंत आहे, ती प्रामुख्याने राजकारण व राजकारणी लोकांमुळे.
पण त्यांच महानपण बघा कधी घेतात ते या समृध्द वारशाचे श्रेय? नाही कधीच नाही
या उलट मराठी साहित्य सारस्वतांमधील प्रतिगामी दुर्गा भागवत या राजकारण्यांच्या विरुद्ध साहित्यातून राजकारणी चलेजाव असा लढा उभा करतात, तरी बिचारे राजकारणी हूं की चूं करत नाहीत व साहित्याला मसाला पुरवण्याचे आपले कार्य नित्यनियमाने सिद्ध करत असतात.
दोन मिनिटे असंबद्ध बोलण्याची स्पर्धा घेतली तर ह्या भल्याभल्या साहित्यिक प्राण्यांची फेफे उडेल पण आमचे राजकारणी तासंतास असंबद्ध बोलून जनतेची करमणूक करत असतात. साहित्यिक एक तासभर भाषणाचे हजारो रुपये घेतात आणि आमचे राजकारणी ही करमणूक मोफत करतात.
मिळमिळीत जादूचे प्रयोग पाहण्यासाठी आम्ही दोन दोनशे रुपयाची तिकीट काढून थिएटर मध्ये जातो पण राजकारणी कसले जबरदस्त जादूचे प्रयोग मोफत करून दाखवतात. खळखळत वाहणाऱ्या नदीच्या जागी ताजमहाल उभारतो तर मुलांच्या खेळण्याच्या जागेवर चकचकीत मॉल पाहता येतो, पण यांच्या जादूचे ना कौतुक ना शाबासकी.
म्हणून मी म्हणतो आपण राजकारण आणि राजकारणी यांच्यावर टीका न करता त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करूया. या अतिशय दुःखमय जगामध्ये आनंदाचे चार शिंतोडे उडविण्याचे,करमणूक करणारे हेच ते खरे कलाकार आहेत.
काय पटतय ना?

Published by sunilganeshdeshpande

Like to express.

4 thoughts on “राजकारण आणि राजकारणी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: