Categories
General Topic

त्याचं घोरणं🎵🎵

त्याचं घोरणं🎵🎵
त्याच्या खर्ज्यातल्या घाsची
आणी काळी पाचच्या घाsची
चालली आहे जुगलबंदी।
माझ्या डोळ्यांच्या पहा-यात मात्र,
झालीये झोप जायबंदी ।।1।।
शरण आले देवा तुला, देते मी खात्री,
नवस फेडीन तुझा, जागून सात रात्री।
अशक्य आहे थांबणं, आता त्याचं घोरणं,
माझ्यासाठी कर देवा, त्याचंच अंगाई गाणं,
त्याचंच अंगाई गाणं ।।2 ।।
– स्वाती कुलकर्णी.
16.6.89

3 replies on “त्याचं घोरणं🎵🎵”

Leave a Reply