Categories
General Topic

रेखाआत्या

आजीच्या अनुपस्थितीत रेखाआत्या होती सर्वांची मम्मी;

भावंडांमधे जास्त लाडकी आहे तिची लहान बहीण निम्मी,

दिवसंरात्र कष्ट केले तिने जुळवायांस आपल्या भावंडांची लग्न;

राहात नाही तिला आठवण खाण्यापिण्याची एकदाका ती झाली कामात मग्न,

तिच्या पोटी जन्मले शुभांगीताई आणि अमित सारखे दोन मोती;

नेहमीच जपल्या तिने सासरच्या आणि माहेरच्या सर्वच नातीगोती,

सदैव तयार असते ती खायला असो कुठलाही लाडू;

आश्चर्य वाटतं कसेकाय ओळखीचे असतात तीच्या सगळ्यांचेच जावई आणि साडू,

कामास एका पायावर तयार असते ती असो लग्न किंवा मुंज;

वर्षानुवर्ष देत आहे ती तिच्या फ्रोझन शोल्डरशी झुंज,

कार्यक्रम असला की तिची धडक असते कार्यालयात थेट;

कधीच सोडत नाही ती बोलायचा चान्स जेंव्हा होते नातेवाईकांची गाठभेट, 

खडानखडा पाठ आहेत तिचे श्रीसुक्ताची ओळन् ओळ;

सर्वत्र तिची ओळख आहे असो पुण्यातले कुठलेही गल्लीबोळ,

तिला गप्पा मारायला विषय नाही लागत कधीच कुठलाही खास;

तिच्याशी फोनवर बोलताना कळत नाही कसे संपतात तासन तास,

लपवून ठेवते आतल्या डब्यात अमितसाठी ती स्पेशल खाऊ;

बाहेरून कडक दिसत असली तरीही स्वभावाने आहे ती खूपच मऊ,

मला हक्काने मागते ती कधीही हवी असेल जर तिला लिफ्ट;

लाखमोलाचं असतं तीच्या आशिर्वादांचं प्रेमळ गिफ्ट, 

गायब होतात तीचे दुखण्यामुळे आलेले डोळ्यातील आसु;

एकदाका तिने पाहिले चिरागच्या चेहर्यावरचे इऊलेसे हसु,

प्रत्येक नववधूला सांगते ती ‘लग्नानंतर सांभाळ गं बाई तुझी फिगर;

खात्री आहे मला संतुलित आहाराने कंट्रोलमधे ठेवेल ती आपली श्युगर!!!

Latest posts by Ek Veda Kavi (see all)

Leave a Reply