ते आहेत दिगंबर; घरातले जनाकाका आणि ॲाफिसातले Digs;
आजी नक्कीच खायला देत असणार त्यांना काजू बदाम आणि Figs,
सर्वच कामं ते करतात असो धुणंभांडी किंवा दळण;
फक्त पाॅझीटिव ॲटीट्यूड दिसतो त्यांचा असो जीवनातील कुठलेही वळण,
शैलाकाकू जनाकाका आहेतच जणू लक्ष्मी नारायण;
चुकवत नाहीत कधीच ते अभ्यंकरांचं पारायण,
दादा आणि ते म्हणजे होती जोडी राम-लक्ष्मण;
सदैव पाठीशी असतात ते असो कधीही पैशांची चणचण,
कधीच फोर्स करत नाहीत कुणावरही ते आपलं मत;
दिसतं मला त्यांच्यात बोंटडकर कुटुंबातील मायेचं छत,
आम्हा सर्वांवर सदैव असो त्यांच्या प्रेमाची सावली;
कठीण प्रसंगात ते असतात माझे खरे वीठू माऊली,
नेहमीच असते माझ्यावर त्यांच्या आशीर्वादाची छाया;
नक्की सांगतो..कधीच कमी पडू देणार नाहीत ते मला माझ्या वडिलांची माया!!!
Latest posts by Ek Veda Kavi (see all)
- प्रणव - January 12, 2020
- आई - January 7, 2020
- निर्मलाआत्या - January 2, 2020
One reply on “जनाकाका..”
खुपच छान. Best portrait of Janabhau, the off bit person.