आजच्या चार ओळ्या आहेत माझ्या प्रिय पुर्वा साठी;
देवानेच बांधुन ठेवल्या होत्या आमच्या लग्नाच्या गाठी,
विधीलिखित लिहून ठेवलेली ती वेळ आली;
२००९ साली आमची पहिली भेट झाली,
तीच्या येण्याने आयुष्यात आली खूपच छान बहार;
नेहमीच ठेवती ती माझा डायेटयुक्त आहार,
तीचा सल्ला म्हणजे दुख्खावर पेनरीलिफ बाम;
परफेक्शन असतं तिचं कुठलेही असो काम,
प्रत्येक कार्यक्रमात असतो तीचा प्रेमाचा आहेर;
मान ठेवते सर्वांचां सासर असोवा माहेर,
ठेवते ती सदैव भावनांवर संतुलित ताबा;
तीच्या खूपच जवळचे आहेत ओंकार आणि बाबा,
सईचे मार्क छान असतात असो कुठलीही सेमिस्टर;
म्हणुनच आहे पूर्वा माझी परफेक्ट होम मिनिस्टर,
मला म्हणते ‘ reduce your tummy and increase your chest’;
अर्रे एकदा तरी नक्कीच करून बघा तिच्या केकची टेस्ट,
सगळेच म्हणतात पूर्वा आहे बोंटडकरांची नंबर वन सून;
आज सांगतो लवकरचं करू आपलं सेकंड हनीमून!!!