Categories
Poetry

हात दे हातात गंss

(मैत्रिणी बरोबर हुंदडायची ईच्छा झाल्यावर…)
हात दे हातात, बागडू मौजेत,
चल जाऊ झोकात गं…..
डोंगर माथ्यात,मंद सूर्यास्तात,
हात दे हातात गं….
बांबूच्या बनात, माडांच्या सावलीत,
हात दे हातात गं…
स्वप्नांच्या जगात, जाऊ या ढगात,
हात दे हातात गं…
लोळूया मजेत, मखमली गवतात,
हात दे हातात गं…
कोकीळेला सादत, मेंढ्यांच्या कळपात,
चल जाऊ झोकात गं….
गोड हसू गालात, टाळ्यांच्या नादात,
चल जाऊ झोकात गं…..
गाईंच्या घंटात, मंजुळ निनादात,
चल जाऊ झोकात गं…..
हिरव्या रानात, द्राक्षांच्या मळ्यात,
हात दे हातात गं…
मोकाट सुसाट, वा-याशी स्पर्धत,
चल जाऊ झोकात गं…..
वीज भिने अंगात, आपल्याच दंगात,
चल जाऊ झोकात गं….
ढग दाटी नभात, चिंब भिजू पावसात,
हात दे हातात गं…
नाचू या तालात, गाऊ या रंगात,
हात दे हातात गं…
चांदणे नभात, चंद्र लपे झाडात,
हात दे हातात गं…
आनंद मनात, मावीना गगनात,
चल जाऊ झोकात गं……
तृप्तता साठत, हस-या घरट्यात,
वाट धरू परतीची गं….
हात दे हातात, बागडत मौजेत,
चल जाऊ झोकात गंssssssss

स्वाती कुलकर्णी.

9th February 1991

3 replies on “हात दे हातात गंss”

छान झाली आहे कविता. निसर्गाची कोणती रूप राहिली आहेत का? वर्णन करायची असा प्रश्न पडला. वा मस्त

Leave a Reply