Categories
General Topic

माझी स्वीटहार्ट सई


आजची
 कवीता आहे माझी स्वीटहार्ट सई 

घरात येते रंगत जेंव्हा एकत्र असतात सई पूर्वा आणि आई,

आहेत तीचे बोलके आणि पाणीदार डोळे

रडू आलं की सर्वांचं ऋदय होते लोण्याचे गोळे,

तीला आवडतात गुलाबजाम आणि त्याचा पाक

सर्व मुलांमधे येतो हुरुप ऐकुन तिची एक हाक,

शाळेच्या परीक्षेची तिला असते सदैव आस

छान छान मार्क मिळवायचा तिचा असतो कायम ध्यास,

रहायला आवडत तिला नेहमीच टिपटाॅप,

कार्टून मधे तीचा फेव्हरेट आहे छोटा सिंघम काॅप,

सतत गूणगूणत असते गाण्यांच्या ओळी

आईला म्हणते दे मला फक्त तूप लावलेली पोळी,

आजीला सांगते माझ्यासाठी काकडी गाजर काप

कार्टुन लागलं की TV समोर बसते आपोआप,

लहान असोवा मोठे ती ठेवते सर्वांचा आदर

घरी असलो की म्हणते बाबा करू का एक गाणं सादर,

आजोबांवर होता तिचा जीव आणि आहे तिचं खूप प्रेम

म्हणते त्यांच्या शिवाय कम्म्प्लीट होत नाही फॅमिली फोटोफ्रेम,

सोहम आणि यश आहेत तिचे फेव्हरेट भाऊ

कधीही तयार असते खायला ती गोडगोड खाऊ,

रोज सांगतो तिला मोबाईल गेमवर ठेव थोडा ताबा

आयुष्यभर नक्कीच साथ देईल तुला हा तुझा बाबा..

Latest posts by Ek Veda Kavi (see all)

4 replies on “माझी स्वीटहार्ट सई”

सुंदर. यमक सुंदर जुळली आहेतच, पण सईचे गुणवर्णन व व्यक्तिमत्व खुप प्रभावी झाले आहे.

Leave a Reply