Kinfolk club

सुट्टी नाश

आज आपली सुट्टी आहे
ट्रॅफिक शी कट्टी आणि
सोफा शी बत्ती आहे
आज आपली सुट्टी आहे
पिल्लाला सांगितलंय
निवांत झोपायचंय
बायकोला समजावलंय
बाहेर नाही जायचंय
तेव्हाच तो phone वाजतो
Boss म्हणतो “Production is down
No one is around ”
I defend say “Chill !!!”
He says “office आके  मिल !!!!!”
दोन मिनिटांच्या शांतते नंतर
बाहेर मी डोकावतो
आमच्या मावशींना आलेला
आजचा उच्चाह दिसतो
Jeans सगळ्या चिंब होवून
लटकत तारेवर पाडल्या आहेत
आणि कदाचित  त्यातल्या किल्ल्या
डुंबत तळाला बुडाल्या आहेत
आज माझी सुट्टी होती
Traffic शी कट्टी होती
Sofa शी बत्ती होती
आज माझी सुट्टी होती
— निरंजन कुलकर्णी (२०-ऑक्टोबर-२०१९)
Skip to toolbar