Categories
Poetry

Baby रॅप

आई जरा ऊठ
आर्धा तास झोप झाली
तुझ्या साठी खूप
आई जरा ऊठ

बाबा ला हवाय चहा कॉफी
मला थोडा दूध
आई जरा ऊठ

बाहेर पडलीये हवा मस्त
फिरायला जाऊ सगळे दोस्त
आई जरा ऊठ
आई जरा ऊठ

लंगोट माझा बदलताना
बाबा चिडतोय खूप
आई please जरा ऊठ
आर्धा तास झोप झाली
तुझ्या साठी खूप
आई ऊठ….आई ऊठ.. आई ऊठ ..आआआआ ..आ आ आ आ ….

–निरंजन कुलकर्णी (१८-सप्टेंबर -२०१९)

Latest posts by Niranjan Kulkarni (see all)

2 replies on “Baby रॅप”

Leave a Reply