Kinfolk club

प्रिय सखी

माझी तिची गूढ मैत्री
मला हवी ती रोज रात्री

दिवसातील एक त्रितीअंश वाहिला तिज साठी
न विसरता आठविते दिवसाकाठी

कॉलेज मध्ये असते नेहमी माझ्या पाठी
विसरतो फाक्त तिला परीक्षे साठी

अंधारच साकारतो तिचे येणे
उजेडच घडवितो तिचे जाणे

मेल्यावरही आहे जिला होप
ती माझी प्रिय सखी झोप

— निरंजन कुलकर्णी (०७-डिसेंबर-१९९७)

Skip to toolbar