अरे माझ्या मित्रा
होऊ नको दुःखी
दुनियेवर रुसून
बनू नको खच्ची
रडण्याने का कुणाचे
दुःख कमी झालाय
लढणंच आयुष्य आहे
दुःख थोडच चुकलंय
कोणी नाही आपलं
अस नको मानू
दुसऱ्यांच्यातला राम शोध
आणि काम ठेव चालू
प्याद्यांच्यातील नाहीस तू
आहेस तू राजा
दुनियेच्या पटावर
गाजवतो जो सत्ता
परत आता रडताना
दिसलास जर मला तू
नाही वाईट माझ्या सारखा
लक्षात ठेव तू !!!
— निरंजन कुलकर्णी (२६-जनुकारी-२०००)