Categories
Poetry

अरे माझ्या मित्रा

अरे माझ्या मित्रा
होऊ नको दुःखी
दुनियेवर रुसून
बनू नको खच्ची

रडण्याने का कुणाचे
दुःख कमी झालाय
लढणंच आयुष्य आहे
दुःख थोडच चुकलंय

कोणी नाही आपलं
अस नको मानू
दुसऱ्यांच्यातला राम शोध
आणि काम ठेव चालू

प्याद्यांच्यातील नाहीस तू
आहेस तू राजा
दुनियेच्या पटावर
गाजवतो जो सत्ता

परत आता रडताना
दिसलास जर मला तू
नाही वाईट माझ्या सारखा
लक्षात ठेव तू !!!

— निरंजन कुलकर्णी (२६-जनुकारी-२०००)

Latest posts by Niranjan Kulkarni (see all)

2 replies on “अरे माझ्या मित्रा”

तोडलस रे. तुझ्याच आयुष्याचा धांडोळा घेतला आहेस असे वाटले. संघर्षमय भूतकाळातून विजयी भविष्याच्या वाटचालीसाठी अभिनंदन.

तुझी प्रिय सखी जरा लवकर रुसते. Most innovative

Leave a Reply