Home

 • प्रणव

  January 12, 2020 by

  प्रणव लिहीतोय चार ओळी आज काय काय सांगू सर्वानां प्रणवबद्दल; चूकुन देखील केलं कोणी त्याला GK मधे चॅलेंज तर बरोबर जीरवतो तो त्यांची अद्दल, असतो सदैव हसतमुख आणि म्हणतो मी आहे थोडासा इंट्रोवर्ट; लगेच सफाईला लागतो जर का दिसली घरात त्याला थोडीशी जरी डर्ट, अथक परिश्रम आणि कष्ट करून मिळवले त्याने उत्तमोत्तम काॅलेज; सदैव वाचन… Read more

 • Japanese greetings

  January 9, 2020 by

  日本語 Romaji English meaning ありがとうございます Arigatou gozaimasu Thank you どういたしまして Dou itashimashite Mention not おめでとうございます Omedeto gozaimasu Congratulations おはようございます Ohayo gozaimasu Good morning こんにちは Konnichiwa Hello / Good afternoon こんばんは Konbanwa Good evening おやすみなさい Oyasuminasai Good night もしもし Moshi moshi Hello (on phone) お名前は何ですか O namaewa nan desuka What is your name? 私は__です Watashiwa ___… Read more

 • आई

  January 7, 2020 by

  आम्हा सर्वांसाठी दादा आहेत विठूमाऊली आणि तु खरी रखुमाई; छान शब्दच मिळत नव्हते जेंव्हा लिहायला बसलो चार ओळी आज तुझ्यासाठी आई, लहानपणापासून जेवताना ताटात वाढलस आम्हांला तू भरपूर तूप; आत्ता जमल्या चार ओळी जेंव्हा विचार मी केला तुझ्याविषयी खूप, वाढदिवसाला देते तु आशिर्वाद म्हणून २००० ची नोट; आयुष्यात नेहमीच खात्री केलीस तु राहू नये घरात कोणाचेही भूकेलं पोट, रोज आंघोळ करून तुला नमस्कार करताना नसते आशिर्वादांची तुझ्याकडे कधीच कमी; सईने हट्ट केला की तु ती पूर्ण करणार याची सदैव असते तीला नक्कीच हमी, तुला वाटते भीती कुत्र्यांची असो तो राॅकी किंवा टाॅमी; सर्व भाच्यांची सर्वात लाडकी आहेस तूच प्रेमामामी, लहानपणी अभ्यास करताना तू कधीच नाही वापरलीस मारायला फूटपट्टी; रोज तासनतास फोनवर बोलताना कळून येते तुझी आणि शैलाकाकूची गट्टी, ॲक्सिडेंट झाल्यावर तू घातलंस त्याला आपल्या लहान मुलासारखं खायला खाऊ; सुहासकाका नेहमीच वागतो जसाकाही तो आहे तुझाच लहान भाऊ, आयुष्यात हे नाही किंवा ते नाही म्हणून तु कधीच नाही केलास कुठलाही कागा; खूप कष्टाने नाजूकरीत्या सांभाळलास तू सर्व नात्यांमधला अचूकसां धागा, कर्नाटकातून आलीस तू मराठी जरी नाही आलं तुला बोलतां तसं स्पष्ट; खरोखरी घडवलंस आम्हां भावंडांच आयुष्य तू करून सदैव कष्ट, तु कधीच नाही केलास कुणाबरोबर कुठलाही गनिमी कावा; मी तुझ्यासाठी नेहमीच राहीलो तुझा गोंडस छावा( सिंहिणीचे पिल्लू), तू नेहमीच रेडी असतेस सई बरोबर खेळायला असो कुठलाही गेम; खात्री आहे मला तू कधीच कमी पडून देणार नाहीस अमच्यावर असणार तुझं प्रेम, आयुष्यात दिलीस दादांना तू सदैव साथ बनून त्यांची सावली; अर्पण करतो तुला आज या चार ओळी तूच आहेस माझी खरी गुरू माऊली…

 • निर्मलाआत्या

  January 2, 2020 by

  निर्मलाआत्या म्हणजे भावंडांमध्ये सर्वात लाडकी आमच्या अप्पांची; रेखा(आत्या) आणि ती एकत्र आल्या की पर्वणी असते गप्पांची, फळांमधे तीला आवडतात केळीं, चिक्कू आणि आंबा; सदैव दिला तिने आम्हा भाच्यांच्या उच्च शिक्षणास पाठिंबा, नातवंडांमधे आहेत सोहम आणि कबीर तिचे खुपच लाडके; माहीत नाही का डाॅक्टर तीला सजेस्ट करतात खायला कार्ले आणि दोडके, कसब्यातल्या गणपतीवर आहे तिची अपार भक्ती; म्हणूनच की काय तोच तिला देत राहतो अपरंपार शक्ती, कन्या शाळेला मिळाला तिच्या रूपात एक अप्रतीम प्रींसीपल; आत्ता रोज खायला सांगीतलाय डाॅक्टरांनी तीला एक तरी ॲपल, शाहूचौकातले विठोबा आहेत नेहमीच तिच्यासाठी फलदायक; त्यांच्या प्रसादात मिळाला तीला परफेक्ट लाइफ पार्टनर विनायक(काका), विनायक काका तीला म्हणत असतील “मिलेगा नहीं तुम्हें मेरे जैसा कोई दुबारा; त्या दोघांना भेटून नक्कीच अनुभवाल तुम्ही प्रेमाचा वात्सल्यपुर्ण गाभारा, आदर्श शिक्षिका असून तिच्यात दिसते साक्षात सरस्वतीचे रूप; दोन्ही मुलींना सीए आणि डाॅक्टर करताना तिने कष्ट मात्र घेतले खूप, आज या चार ओळींच्या रुपाने आम्ही सर्वजण देतो तिला भरपूर शुभेच्छा; लवकरात लवकर तीची या डायलीसिस मधुन व्हावी सुटका हीच आहे आम्हा सर्व लेकरांची इच्छा…

 • आमची कॅंकून वारी

  January 1, 2020 by

  २०१९ हे वर्ष आम्हा सगळ्यांना एक्दम गडबडीचे आणि बऱ्याच बदलांचे होते. मुलींचे अरंगेत्रम , निहारिकाचे कॉलेज यामुळे हे वर्ष कधी सुरु झाले आणि सरले ते कळले पण नाही .म्हणून शेवटी क्रिसमस सुट्टीत कॅंकून ला जायचे ठरवले. मेक्सिकोच्या आग्नेय दिशेला कॅरिबियन समुद्र किनाऱ्यावर वसलेले हे गाव. एकदम आपल्या गोव्याची आठवण करून देणारे. आमची हे पहिलीच मॅक्सको… Read more

View all posts

Follow My Blog

Get new content delivered directly to your inbox.